Tuesday, December 13, 2011

Prashn Ani Uttar




कधी कधी आयुष्यात अनेक प्रश्न येतात, 
हेच प्रश्न मग मनाला अस्वस्थ करून सोडतात. 
 
मन मग आपल सैर भैर पळू लागत 
समोर आलेल्या प्रश्नांची उत्तर ते शोधू लागत. 
 
आजूबाजूला घडणार्या गोष्टींच मनाला काहीच पडलेल नसत, 
कारण ते तर उत्तर शोधण्यात मग्न असत. 
 
याच शोधात अजुन प्रश्न समोर येतात, 
आन् मनाला अजुन बेभान करून सोडतात. 
 
कधी एका प्रश्नाच उत्तर सापडल, 
टरमन लगेच खुश होऊन जात. 
 
पण बाकीचे प्रश्न दिसले, 
की परत त्यांच्या शोधात निघून जात. 
 
शोध हा असाच चालू रहातो, 
आणि उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त देऊन जातो. 
 
या सगळ्या गडबडीत त्रास कुणाला होतो? 
मनाच्या या धावपलीचा उपयोग तो काय होतो? 
 
प्रश्नोत्तरांच्या धावपळीत आपण पार अडकून पडतो, 
समोर आलेल्या सुखाच्या क्षणाकडे, नकळत का होइना, आपण दुर्लक्ष करतो. 
 
मन माझच आहे, मग ते माझ्याशी अस का वागत? 
मला सोडून सारख सारख दुसरीकडेच का फिरत असत? 
 
हाच प्रश्न आपण आपल्या मनाला विचारतो, 
मग काय, परत तोच प्रश्नोत्तरांचा खेळ चालत राहतो. 
 
यातून स्वतःला सावरायचं कस? 
सैर भैर भाटॅकणार्‍या मनाला आवरायचं कस? 
 
आपलं मन हे आपलं आहे, 
आणि त्यावर आपलाच पूर्ण अधिकार आहे. 
 
प्रश्न तर चालूच राहतील, 
आपल्या मनाला आपल्यापासून तोडू पाहतील. 
 
आपण त्याला तूटू नाही द्यायचं,  
आपल्या मनाला आपल्यापासून दूर होऊ नाही द्यायच. 
 
प्रश्न यायचे ते येत राहतील, 
नेहमीप्रमाणे आपल्या मनाला आपल्यापासून तोडू पाहतील. 
 
पण यावेळी, यावेळी प्रश्न आल्या पावली परत निघून जातील, 
कारण त्यांची उत्तरं आधीच आपल्या जवळ आलेली असतील.... 
 
 
 
 
 
- सौरभ कारखानीस. 

No comments:

Post a Comment